Breaking News

लोक आपण आपटण्याची वाट पाहत असतात - कपिल.


अनेक वाद, अफवा व नकारात्मक बातम्यांनंतर अखेर कपिलने अलीकडेच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. कदाचित हेच कारण असावे की, कपिल पूर्वीपेक्षा जास्त चांगला वाटत आहे. सध्या तो आपला आगामी चित्रपट फिरंगीमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत त्याने अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. 

कपिलला जेव्हा सध्या तुझी मानसिक स्थिती काय आहे? अशी विचारणा केली असता तो म्हणाला, चांगली आहे. मध्यंतरी मी खूप डिस्टर्ब होतो. डिप्रेशनमध्ये होतो, परंतु अलीकडेच मी माझ्या चित्रपटाच्या निमित्ताने ठिकठिकाणी फिरलो. मी जेथे जेथे जातो, तेथे लोक माझ्या चित्रपटाविषयी विचारणा करत आहेत. अनेक लोकांना तर मी भेटलेलोदेखील नाही, परंतु हे सर्व माझे चाहते आहेत. आपल्या चाहत्यांना बघून मला वाटले की, आपण चांगले काम केले पाहिजे. असे म्हटले जाते की, आपण जितक्या उंचावर चढतो, तेवढे आपण एकटे पडतो. 


तुला असा अनुभव आला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणाला, असे वाटते कधी कधी. वास्तवामध्ये उंचीवर पोहोचल्यानंतर आपल्या आयुष्यात काही असे लोक येतात, जे खरे वा खोटे असतात. यामध्ये फरक करणे खूप कठीण होते. आम्हा कलाकारांना अशा लोकांमध्ये उठण्या-बसण्याची सवयच असते. मी मनाने खूप साफ बंदा आहे. लोकांना खऱ्या मनाने भेटतो. जे कुणी माझ्याबरोबर काम करतात, त्यांना मी आपले समजतो, परंतु प्रत्येक जण माझ्याप्रमाणे नसते. अनेक लोक आपल्याला कुठल्या तरी हेतूने भेटतात. अनेकदा तर हे इतके जास्त होते की, आपण कोणावर विश्वास ठेवायचा या विचाराने आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर संशय घेऊ लागतो व त्यामुळे आपल्याला एकटेपणा येतो.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा