जालना - भोकरदन अन्वा रसत्यावरील मानापुर पाटीजवळ दोन मोटर सायकल समोरा समोर धड़कले, तालुक्यतिल नवलवाडि येथील संजय कांबड़े (वय 35) हा अपघातात जागीच ठार झाला तर रमेश दयानंद कांबळे राहणार नवलवाड़ी एकनाथ पंढरिनाथ सुसर (वय 30 रा. मलकापुर), सिद्धार्थ रायभान परखे (वय 35) हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून एकनाथ पंढरिनाथ सुसर याची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या संजय कांबळे यांच्या वडिलाची आज तेरवी होती. नेमका त्याच दिवशी मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
मोटारसायकलच्या धडकेत एक ठार, तीन जखमी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:45
Rating: 5