Breaking News

मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट घडवू ! दाऊदच्या साथीदाराची गर्भित धमकी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांचा काल लिलाव झाल्यानंतर चिडलेल्या दाऊदच्या साथीदाराने धमकी देण्यास सुरुवात केली आहे. दाऊदची मालमत्ता कोणी ताब्यात घेतली तर पुन्हा मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट घडवून आणू. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट करू, असा इशाराच त्याच्या साथीदाराने दिला आहे. 



तिन्ही मालमत्तांच्या लिलावात डी कंपनीने कोणताही रस दाखवला नव्हता. मात्र, दाऊदचा साथीदार उस्मान चौधरी याने रात्री उशिरा एका वृत्तवाहिनीला फोन करुन जर कोणी दाऊदची मालमत्ता ताब्यात घेतली तर मुंबई बॉम्बस्फोटांनी उडवून देऊ अशी धमकी दिली. दाऊदच्या साथीदाराने दिलेल्या या नव्या धमकीमुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.