हार्दिक पटेलचा दुसरा अश्लील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल.
गुजरात मधील पाटीदार समाजातील युवा नेता हार्दिक पटेलचा आणखी एक अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ काल मंगळवारी व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून दलित नेता जिग्नेश मेवानी आणि काँग्रेसने हार्दिकची उघडपणे बाजू घेतली आहे.या व्हिडीओमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एकच खळबळ माजली आहे.
गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अवघ्या चोवीस तासांमध्ये हार्दिक पटेलचा दुसरा आक्षेपार्ह व्हिडीओ उजेडात आला आहे. तो जवळपास चार मिनिटांचा असून, एका हॉटेलच्या खोलीत हार्दिक तरुणीसोबत कथितरीत्या अश्लील चाळे करताना दिसत आहे.
आपल्याला बदनाम करण्यासाठी व्हिडीओ जारी करण्याची चाल खेळली जात असल्याचा आरोप हार्दिक ने केला आहे. त्याला काँग्रेस आणि दलित नेता जिग्नेश मेवानींचा भरभक्कम पाठिंबा मिळाला आहे. हार्दिक व जिग्नेश यांची नुकतीच भेटसुद्धा झाली आहे.
