पालकमंत्री राम शिंदेंसह खासदार दिलीप गांधींचा खोटारडेपणा उघड.
नगर येथील शिल्पा गार्डन ते स्टेट बँक चौक या पुणे-संभाजीनगर महामार्गावरील उड्डाणपुलासह जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले होते.
भाजप खासदार दिलीप गांधी यांनी त्याबाबतची घोषणाही केली होती. मात्र, येथील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागीतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यासन मंत्रालयाने अशा कोणत्याही बैठकीचे आयोजनच केले नसल्याचे लेखी सांगितले आहे. यामुळे श्रेयवादाच्या नादात भाजपचे मंत्री, खासदारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.