नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता हीच सेवा पुरस्कार जाहीर.
अहमदनगर, दि. 12, नोव्हेंबर - नेहरु युवा केंद्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने विविध सामाजिक व जनजागृतीवर उपक्रमात सहभागी होवून उत्कृष्ट कामगिरी करणा-या स्वयंसेवी संस्था,युवा मंडळे,महिला मंडळांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी दिली.
या पुरस्कार प्राप्त संस्थांना सोमवार 13 नोव्हेंबर रोजी माऊली सांस्कृतिक भवन येथे होणा-या लोककला महोत्सवात पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.दिलीप गांधी व जिल्हाधिकारी अभय महाजन उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार प्राप्त संस्थांना सोमवार 13 नोव्हेंबर रोजी माऊली सांस्कृतिक भवन येथे होणा-या लोककला महोत्सवात पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.दिलीप गांधी व जिल्हाधिकारी अभय महाजन उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार प्राप्त संस्थांनी जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित स्वच्छता हीच सेवा, मतदार जागृती,कॅशलेस व्यवहार,ग्रामविकासात युवकांचा सहभाग,बेटी बचाओ... बेटी पढाओ आदि उपक्रमात सहभागी होवून, गावा-गावात या अभियानांचा प्रचार व प्रसार केला.या उपक्रमात शंभरपेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांनी पाचशेपेक्षा जास्त गावात अभियान राबवून, केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा गावो-गावी विनामुल्य प्रचार केला आहे.
स्वच्छता हीच सेवा पुरस्कार प्रस्तावामधून स्वयंसेवी संस्था, युवा व महिला मंडळाची जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या संमतीने पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.तालुकास्तरीय प्रथम क्रमांकास 8 हजार रूपये,द्वितीय क्रमांकास चार हजार रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.
प्रा.अभय शा लिग्राम,प्रा.डॉ.विजय म्हस्के,अॅड.महेश शिंदे यांच्याकडून प्राथमिक मुल्यांकन करुन,सदर पुरस्कारावर जिल्हाधिका-यांनी नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी रसिक रंजन कला अविष्कार बहुद्देशीय संस्थेची निवड करण्यात आली आहे.
