Breaking News

कारवाई थांबवून फेरीवाल्यांना तातडीनं पर्यायी जागा द्याव्यात - सेना.

शिवसेनेची नोंदणीकृत असणारी ‘मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेनं फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी मुंबईभर मोठी तयारी सुरु केली आहे. यासाठी शिवसेनाप्रणित मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची नियोजन बैठक गोरेगाव येथे पार पडली. 


या बैठकीत फेरीवाल्यांवर सध्या होत असणारी कारवाई थांबवून फेरीवाल्यांना तातडीनं पर्यायी जागा द्याव्यात, ही मुख्य मागणी मांडण्यात आली. सध्या परवानाधारक अधिकृत फेरीवाल्यांवरही मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करत आहे. यात अनेक मराठी फेरीवाले आहेत. ज्यांचं जगण्याचं, रोजीरोटीचं साधनच हिरावून घेतलं जात आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका शिवसेनाप्रणित संघटनेनं मांडली आहे.