आमदाराने गेट वे ऑफ इंडिया जवळ शाहरुखला हजारो चाहत्यांसमोर झापले !
आमदार जयंत पाटील यांनी गेट वे ऑफ इंडिया जवळ शाहरुख खानला त्याच्या हजारो चाहत्यांसमोर झापले. 2 नोव्हेंबरला अभिनेता शाहरुख खानचा 52 वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने अलिबागच्या फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते.
शाहरुख वाढदिवस साजरा करून दोन दिवसांनी परत मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाल्याने गेटवेच्या धक्क्यावर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमक्या त्याच वेळी मुंबईहून आपल्या अलिबागच्या घरी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार भाई जयंत पाटील परतत होते.
गेटवे ते मांडवा ही “पीएनपी’ नामक फेरी बोटसेवा जयंत पाटील यांची आहे. शाहरुखच्या बोटीला लागून जयंत पाटील यांच्या पीएनपीची स्पीड बोट उभी होती. धक्क्यावर पाटील यांनी प्रवेश मिळवला आणि बोटीत चाहत्यांना अभिवादन करत असलेल्या शाहरुखला चांगलेच फैलावर घेतले.” काय तुझ्या मालकीचा आहे का हा धक्का? अलिबाग, मांडवा येथे जाणाऱ्यांनी लोकांनी कसे जायचे? हा धक्का सार्वजनिक आहे. पिक्चरच्या शूटिंगची ही जागा नाही,’ असे ते शाहरुखला म्हणाले. त्यांच्या या रुद्रावताराने सगळेच आचंबित झाले.
