Breaking News

अखेर स्मार्ट सिटी कामास सुरुवात, 15 महिन्यांत तयार होणार 20 कोटींचा अत्याधुनिक रस्ता

सोलापूर, दि. 12, नोव्हेंबर - दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना शहरात प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या यादीत सोलापूर शहराचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार शिवछत्रपती रंगभवन चौक ते डॉ. आंबेडकर चौक हा 1.1 किलोमीटर रस्ता अत्याधुनिक करण्यात येत आहे. त्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. 

हे काम निखील कन्ट्रक्शन पुणे यांच्याकडून करण्यात येत आहे.येत्या 15 महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी योजनेत 2170 कोटींचा आराखडा आहे. त्यापैकी 20.97 कोटींच्या कामास सुरुवात झाली. त्यासाठी तीन महिने रस्ता बंद असणार आहे. दरम्यानच्या काळात ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रा असल्याने त्यावेळी तीन दिवस रस्ता खुला करण्यात येईल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे अभियंता तपन डंके यांनी सांगितले. यात्रा काळात भाविकांची अडचण होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. या परिसरात चार शाळा आहेत. विद्यार्थ्यांची ये-जा असतेे. भुयारी मार्गामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा शक्य होईल.
3 महिने रस्ता बंद रंगभवन चौकते ह.दे. प्रशालेपर्यंत पहिल्या टप्प्यात काम करण्यात येणार आहे. यात युटीलिटी डक्टचे काम करण्यात येणार आहे. मुख्यरस्ता आणि भुयारी मार्ग नंतर करण्यात येणार आहे. - या परिसरातशाळा आहे. विद्यार्थी नागरिकाच्या जीवास धोका निर्माण होऊ नये म्हणून रस्ता बंद करण्यात आला आहे. 

रस्त्यावर मशिनरी फिरणार आहे. -कामकरताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून तीन महिन्यापर्यंत रस्ता बंद असणार आहे, असे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात आले.यारस्त्याच्या दोन्ही बाजूस युटी लिटी डक्ट घालण्यात येणार आहे. त्यात पाण्याचे पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, विजेचे वायर, दूरसंचार केबलची व्यवस्था असेल. त्यामुळे रस्ता खोदाई कधीही होणार नाही.
या आहेत समस्या ट्रेझरी शाखा ते पूनम गेट हा मार्ग वन-वे आहे. हा नियम शिथील केल्यास दोन्ही बाजूला थांबणारी वाहने हटवावी लागतील. अथवा पी वन पी टू याचा अवलंब करावा लागेल. किंवा हवा ट्रेडर्स दुकानासमोरून रंगभवनकडे वाहने सोडावी लागतील. शुक्रवारी सायंकाळी रिक्षा, कार, दुचाकी जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस अधीक्षक क ार्यालयातून ये-जा करीत होती. वाहतूक कोंडी होऊ शकते. दुचाकी सोडून अन्य वाहनांना बंदी पाहिजे. तरच नियोजन होऊ शकते.