Breaking News

डाळिंबाचे दर पडले, उत्पादकांमध्ये चिंता.

सोलापूर, दि. 12, नोव्हेंबर - सांगोला तालुक्यातील डाळिंबांना मागणी असते. परंतु तालुक्यात यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने झाडावरच डाळिंब कुजल्यामुळे गणेश भगवा डाळिंबाचे दर पडले आहेत. गणेश डाळिंबाला ते 20 रुपये प्रतिकिलो तर भगव्याला 10 ते 58 रुपये प्रतिकिलो सध्या दर मिळत आहे. 


हाच दर यापूर्वी 30 ते 60 रूपये गणेश आणि 60 ते 120 रूपये दर भगवा डाळींबाला होता. यातून उत्पादन खर्चही भागत नसल्याचे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मालाची प्रतवारी चांगली नसल्याने बाजारात चांगला माल नसल्याने दर पडल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सांगोला तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे फळबागामध्ये तण रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरली. तण काढण्यासाठी महिलांना 150 ऐवजी 250 रुपये तर पुरुषांना 300 ऐवजी 350 रुपये मजुरी असून, मजूर उपलब्ध नसल्याने वाढवून द्यावी लागली. एका तासाला काही ठिकाणी छाटणी तण काढण्यासाठी 100 रुपये घेतल्याचेही शेतकरी सांगतात. 

मजूर लावणे परवडत नाही म्हणून अनेक शेतकर्‍यांनी ताशी 350 रुपये दराने मशीनच्या सहाय्याने गवत काढून घेतले. त्याचा एकरी खर्च ते साडेतीन हजार एकरी गेल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले. दररोज थोडा थोडा पाऊस ऑगस्ट 17 ते 10 ऑक्टोबर दरम्यान पडल्याने उभ्या पिकामध्ये भयानक तण वाढले. 

त्यामुळे फळावर बुरशी इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने यावेळी डाळिंब बागावर 35 ते 40 वेळा विविध कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्या लागल्या. जादा पावसामुळे अनेकांची फळे झाडावरच कुजली. एवढा मोठा खर्च करूनही मालाला दर नसल्याने शेतकरी वर्ग डाळिंब बागा काढून त्या ठिकाणी फळ पालेभाज्या लावण्याच्या विचारात आहेत. डाळिंब उत्पादकांत चिंता आहे.