अवैध उत्खनन,वाहतूकदारांना 5.20 लाखांचा दंड.
नागपूर, दि. 12, नोव्हेंबर - अवैधपणे रेती तसेच गौण खनीजाचे उत्खनन तसेच वाहतूक करणा-यांकडून नागपूर जिल्ह्यात 41 प्रकरणात 5 लाख 20 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज, शनिवारी दिली.
तालुका व उप विभागीय स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली असून अवैध वाहतूक करणार्या तसेच रेतीचे उत्खनन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 499 प्रकरणात 98 लाख 30 हजार 541 रुपये शासन जमा करण्यात आले आहे.

तसेच 28 प्रकरणात 4 लाख 91 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अवैध उत्खनन व वाहतूक नागपूर तालुक्यात 19 हजार चारशे, हिंगणा 97 हजार 200, भिवापूर 30 हजार 500, कामठी 10 हजार 400, पारशिवनी 42 हजार 800, रामटेक 7 हजार 900, उमरेड 34 हजार 500, काटोल 77 हजार 700, नरखेड 18 हजार 700, कुही 22 हजार 800, कळमेश्वर 67 हजार रुपये शासन जमा करण्यात आल्याचे कुर्वे यांनी सांगितले.