Breaking News

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांचे निधन.

डोंबिवली, दि. 12, नोव्हेंबर - शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, नामवंत विधिज्ञ अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई व नातवंडेविार आहे.

डोंबिवलीत शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली. डोंबिवली नगरपरिषद असताना शिवसेनेचे ते पहिले नगरसेवक ठरले होते. त्यांच्या दिवंगत पत्नी सीमा ठोसर क ल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती होत्या.
डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला ओळखला जायचा मात्र या बालेकिल्ल्यात शिवसेनेची पाळेमुळे रूजविण्यात ठोसर यांचीही प्रमुख भूमिका होती. नामवंत विधिज्ञ असल्याने कायद्याचा गाढा अभ्यास होता. शिवसेनेचे सामाजिक खटले ते लढवत. 

अभिनव सहकारी बँक, ग्रीन्स इंग्लिश स्कूल अशा अनेक संस्थांवर त्यांनी अध्यक्ष व संचालकपद भूषविले. डोंबिवली ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी शिवाई बालक मंदिर या शाळेची उभारणी केली. हिरवाई उत्सव मॅरेथॉन अशा प्रकारचे उपक्रमांची सुरूवात त्यांनी केली.