भूसंपादन एजन्सी न नेमल्याने औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरण रेंंगाळले
औरंगाबाद, दि. 12, नोव्हेंबर - चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनत चालला आहे. या प्रश्नी अधिकारी निव्वळ मुंबईच्या वार्या करीत आहेत. भूसंपादन एजन्सीची निवड न झाल्याने यावर निर्णय होत नसल्याचे बोलले जात आहे.
चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचे गेल्या वर्षभरापासून भिजत घोंगडे पडले आहे. डीएमआयसी प्रकल्पाने शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असावे, अशी मागणी जोर धरू लागली. या विमानतळाचे लकवरच विस्तारीकरण व्हावे, यासाठी नुकतीच जागेची पाहणीही करण्यात आली. यात सुमारे 1200 वर मालमत्ता बाधित होत आहे. सिडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, मूर्तीजापूर गावांतील जमिनी यात संपादित करण्यात येणार आहेत.