Breaking News

महाखादी’ यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक, दि. 12, नोव्हेंबर - नागरिकांनी खादीचा वापर करतानाच त्यासाठी इतरांना प्रेरित करणे गरजेचे असून खादीबददल प्रचारातूनच राज्यासह देशभरात खादीची माहिती पोहोचेल, असे महारा्ष्ट्र राज्य खादी व ग्रामउदयोग मंडळाचे सभापती विशाल चोरडीया म्हणाले. ‘महाखादी’ यात्रेचे हुतात्मा स्मारक, नाशिक येथे विशाल चोरडीया मुंबई यांच्या हस्ते उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.


पहिला दिवस असूनही महाखादी यात्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार सीमा हिरे, सहाय्यक संचालक उद्योग पी.पी.देशमुख, जेष्ठ स्वातंत्र सैनिक वसंत हुदलिकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग आदी उपस्थित होते.
यावेळी सुरुंग म्हणाले, शासनाचा या उपक्रमास राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी महाखादीयात्रेतील विक्री दालनांना भेट देवून खरेदी करावी, तसेच विद्यार्थ्यांनी या माहितीपूर्ण उपक्रमास भेट द्यावी असे ते म्हणाले. 

यात्रेत खादीचे वस्त्र, मध तसेच ग्रामीण भागातील ग्रामोद्योगी कारागिरांनी तयार केलेली विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच चरख्यापासून सूत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. 14 व्या शतकापासून बदल होत गेलेले सर्व चरखे ठेवून प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे व मध तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिकही यात्रेत दाखविण्यात येत आहे.
खादी उत्पादनांचा प्रचार व प्रसारासाठी राजभवन मुंबई ते राजभवन नागपुर अशी 21 जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारी ‘महाखादी’ यात्रा नाशिक मधील हुतात्मा स्मारक येथे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या कालावधीत खुली राहणार आहे. खादी व ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देणेसाठी ‘महाखादी’ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात्रेचा शुभारंभ राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाला.