Breaking News

आदर्शगांव सुरेशनगरच्या सरपंचपदी पांडूरंग उभेदळची सर्वानूमते निवड.

नेवासा/प्रतिनिधी/- नेवासा तालूक्यातील सुरेशनगर आदर्शगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पांडूरंग उभेदळ यांची तर उपसरपंचपदी अनिताताई उभेदळ यांची शुक्रवार दि. २४/११/१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.



या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गांवचे माजी उपसरपंच विठ्ठल पाषाण होते.माजी सरपंच भगवान दळवी,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापू शेगर,नाथा बाबर,बबन शेटे,दिलीप शेटे,अनिल उभेदळ,अण्णाभाऊ क्षिरसागर,भिमा चव्हाण,ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव उभेदळ,भागचंद पाडळे,साहेबा सावंत,आशा पाषाण,मैनाबाई बाबर,उज्वला खंडागळे यांनी थेट जनतेतून सरपंचपदी पांडूरंग उभेदळ यांची निवड झाल्यानंतर उपसरपंचपदाच्या निवडीसाठी अनिताताई उभेदळ यांच्या नावाची सुचना ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव उभेदळ यांनी मांडली या या निवडीला सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली