Breaking News

जामखेड येथे महाडीबीटी पोर्टल कार्यशाळा संपन्न.

जवळा/ प्रतिनिधी/-जामखेड महाविद्यालयात महाडीबीटी पोर्टल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली होती.यावेळी जामखेड महाविद्यालय जामखेड व तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष प्राचार्य देशमुख.आर.बी, शासकीय वसतीगृहचे अधीक्षक चव्हाण सर,डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरचे डहाळे (ओ एस)आणि डेअरी डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य शेख अलताफ,बी ड कॉलेज प्राचार्य गायकवाड, जामखेड महाविद्यालय जामखेडचे एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी प्रा.फलके ए बी,ल.ना.होशिगं विद्यालय ज्यु कॉलेज जामखेडचे प्रतिनिधी व तालुका समन्वयक नारायण आयकर, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नारायण आयकर म्हणाले की विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती मध्ये.यंदाच्या 2017-18 या वर्षात बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीची माहिती भरण्यासाठी नव्याने पोर्टल तयार करण्यात आले आहे.3ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत 2017-18 पासून www.mahadbt.gov.in हे संकेतस्थळ सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व संबंधित लिपिकांनी याबाबत विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून समाजकल्याण विभागामार्फत 2016-17 पर्यंत सुरू असलेले www.mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दुसरे पोर्टल सुरु केले आहे.या पोर्टलमध्ये बरेच बदल आहेत. 

ते महाविद्यालयांना कार्यशाळा घेवून सांगण्यात येत आहे. या वर्षापासून शिष्यवृत्तीसाठी www.mahadbt.gov.in हे संकेतस्थळ वापरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बँक खाते क्रमांक हा आधारकार्डशी संलग्न करणे तसेच विद्यार्थी आधारकार्ड हे मोबाईल नंबरशी संलग्न करणे बंधनकारक आहे