रोडरोमिओंच्या त्रासामुळे विद्यार्थिनीची जेजुरीत आत्महत्या
पुणे, दि. 23, नोव्हेंबर - जेजुरीतील एका शालेय विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नेहा संतोष कदम असे या विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आत्महत्या केलेली विद्यार्थिनी ही जेजुरी येथे एका महाविद्यालयात इयत्ता 11 वीमध्ये शिक्षण घेत असून, ती कदमवस्ती येथून जेजुरीला दररोज महाविद्यालयामध्ये येत होती.कदम वस्तीनजीकच्या गरुडवस्ती येथील किरण एकनाथ गरुड व राकेश भाऊसाहेब गरुड हे तरुण तिला रोज जाता-येता मोटारसायकल, चारचाकी वाहनाने पाठलाग करीत होते. अश्लील चाळे करून हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होते.

आरोपी किरण गरुड याने तिचे फोटो काढून बदनामी करीत होता. या छेडछाडीला कं टाळून तिने शेतातील पावट्याच्या पिकावर फवारणीसाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केले. मुलीने विषारी औषध घेतल्याचे तिचे वडील संतोष कदम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. गेले पाच दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती.
मात्र अखेर तिचे निधन झाले. या घटनेने क दमवस्ती व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.जेजुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली असून, त्यांना बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012, तसेच विनयभंग व आत्महत्येस प्रवृत केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील हे करीत आहेत.