श्रीलंकेत जातीय हिंसाचार, संचारबंदी.
कोलंबो : श्रीलंकेच्या दक्षिणेकडील गाले जिल्ह्यात जातीय हिंसाचार उसळल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून शुक्रवारी रात्री संचारबंदी लागू करण्यात आली.यावेळी जिल्ह्याच्या विविध भागांत दाखल झालेल्या पोलीस दलाच्या तुकडीने या प्रकरणी १९ जणांना अटक केली.
येथील बहूसंख्यक सिहली समाजाशी संबंधित किरकोळ घटना घडल्यानंतर येथील अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या दुकानांवर व घरावर हल्ले करण्यात आल्यानंतर हिंसाचारला सुरुवात झाली. या भागात पोलीस दल व लष्करी दलाच्या तुकड्या तैनात केल्याची माहिती वरिष्ठ मंत्री विजिरा अबेवर्दना यांनी दिली.
