अमेरिकन सैन्य दलांत ४ वर्षांत लैंगिक अत्याचाराच्या सुमारे २०,३४८ घटना
वॉशिंग्टन : अमेरिकन सैन्य दलांतील विविध आस्थापनांत मागील ४ वर्षांत लैंगिक अत्याचाराच्या सुमारे २०,३४८ घटना घडल्याची माहिती पेंटागॉनने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे.संरक्षण मंत्रालयाच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक व प्रतिसाद कार्यालयाने (एसएपीआरओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०१३ ते २०१६ या ४ वर्षांच्या कालावधीत अमेरिकन पायदळात लैंगिक अत्याचाराच्या सर्वाधिक ८,२९४ घटना घडल्या.
नौदलात ४,७८८, मरिन कॉर्पसमध्ये ३,४०० आणि हवाई दलात ८,८७६ लैंगिक अत्याचार घडले. पायदळात जवळपास १.३ सक्रिय सैनिक आहेत. अमेरिकेतील राजकीय, सांस्कृतिक व व्यावसायिक क्षेत्रातील विख्यात व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करातील गैरवर्तनाचा हा खळबळजनक खुलासा झाल्याने अमेरिकेतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
