Breaking News

बॅडमिंटन स्पर्धांसाटी शासन प्रोत्साहन देईल-मुख्यमंत्री

नागपूर, दि. 09, नोव्हेंबर - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांच्या आयोजनामुळे नामांकीत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे अशा स्पर्धांच्या  आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी नागपुरात दिली.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेत विजयी ठरलेली  आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह विजयी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष डॉ. हिमंता सरमा, महाराष्ट्र बॅडमिंटन  संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी, विजय दर्डा, बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे नागपूरात आयोजन होणे ही शहरवासियांसाटीअभिमानाची बाब आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील नामांकीत खेळाडूंचा दर्जे दार खेळ नागपूरकरांना अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष डॉ. हिमंता सरमा यांनी नागपुरातील बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन उत्कृष्ट  करण्यात आल्याचे सांगून विशेष कौतुक केले. आज झालेल्या अंतिम सामन्यातपी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार बॅडमिंटनपटूंमध्ये चुरशीचा सामना झाला. नागपूरकर  क्रीडा रसिकांनीही या सामन्याला भरभरुन दाद दिली. स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.