अंबाजोगाई येथे नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा
बीड, दि. 09, नोव्हेंबर - अंबाजोगाई येथे काँग्रेसच्या वतीन आज केन्द्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ नोट बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने काळा दिवस साजरा करून निषेध करण्यात आला. या बाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई येथे बीड जिल्ह काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर चोक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जुन्या फोटो ठेऊन मोदी यांच्या हस्ते वर्षश्राद्ध करून निषेध करण्यात आले.
