हटवलेले शनी मंदिर एका रात्रीत पुन्हा उभारले
सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर -उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात येत आहेत. आतापर्यंत 150 स्थळे हटवण्यात आली. अक्कलकोट रोडजवळील कर्णिकनगरकडे जाणार्या मार्गावर असलेले शनैश्वर मंदिर महापालिकेने हटवले होते. तेथे पुन्हा मूर्ती बसवून नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
शनिवारी अमावास्या असल्याने तेथे भक्तांची गर्दी होते. तेथे मंडप मारून कार्यक्रम करण्यात आला. अनधिकृत स्थळे महापालिकेच्या वतीने हटवण्यात येत आहेत. त्याप्रमाणे तेथील मंदिर महापालिकेने निष्कासित केले होते. तेथे पुन्हा मंदिर उभे केले. हटवलेले मंदिर पुन्हा उभे केले असल्यास अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने त्यावर कारवाई करावी. - रामचंद्र पेंटर, बांधकाम परवाना विभाग
