आंदोलक शेतकऱ्यावर झालेल्या गोळीबारचा मनसेने केला निषेध
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखाने सुरू झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने किंवा कारखान्याने कुठलाही प्रकारचा हमीभाव किंवा शेतकऱ्याचा मागणी प्रमाणे भाव दिला नाही.यासाठी राज्यभर शेतकरी आंदोलन चालू आहेत.
त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मधील शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते.पण प्रशासनाने हे आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आंदोलन चिघळले यामध्ये पोलिसांनी लाठीमार, अश्रूधूर व गोळीबार केला यामध्ये काही शेतकरी बांधव गंभीरपणे जखमी झाले.
शेवगाव आणि अहमदनगर येथे या घटनेतील शेतकरी उपचार घेत आहेत तरी या सर्व घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध नोंदवत आहोत. यापुढे जर कुठल्याही शेकऱ्यावर अन्याय झाला तर सहन करणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सुभाष घोरपडे नामदेव मुखेकर,अविनाश पालवे,लक्ष्मण डांगे, आर के चव्हाण, संदीप गर्जे,विठ्ठल मिसाळ, जेम्स साळवे, शरद मोरे,विकास तळेकर,आदींचा सह्या आहेत.
