कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पाणी आवर्तनाचे नियोजन
सन २०१७-१८ मधील कालवा सल्लागार समितीची दि.१७/११/२०१७ ला मुंबई येथे बैठक जलसंपदा मंत्री गिरिश महाजनच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये घोड व कुकडी रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले.
यंदा घोड प्रकल्प १००% टक्के भरलेले आहे. कुकडी प्रकल्पात २८ टीएमसी ८५ %टक्के पाणी साठा आहे. योग्य नियोजन केल्यास सर्वाना पाणी मिळेल. यादृष्टिने नियोजन बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पासाठी ४ आवर्तने,घोड प्रकल्पासाठी ४ आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.
यापैकी २ आवर्तने ही रब्बी हंगामासाठी व २ आवर्तने उन्हाळ्यामध्ये होणार आहे. पहिले आवर्तन कुकडीचे १५ डिसेंबर २०१७ तर घोडचे आवर्तन हे २५ डिसेंबर २०१७ ला सुटणार आहे. अशी माहिती आमदार राहुलदादा जगताप पा. यांनी दिली.
बैठकीस मा. अध्यक्ष विधानसभा दिलीपराव वळसे पा. , आमदार राहुलदादा जगताप पा. आमदार बाबूराव पाचरणे,मंत्री.बबनराव पचपुते, मा.आ.अशोकबापु पवार, राजेंद्र नागवड़े,मुख्य अभियंता रजपुत, अधिक्षक अभियंता.वानखेडे,कार्यकारी अभियंता .कोळी तसेच पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पाण्याचा अपव्यय होणार नाही, कमी पाण्यात आवर्तन होवुन सर्वांना व्यवस्थित पाणी मिळावे, या दृष्टीने नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व शेतक-यांना पाणी कसे जाईल याचे अधिका-यांनी आतापासुनच नियोजन करावे हलगर्जीपणा करणा-यांना कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आमदार राहुल जगताप यांनी सांगित