Breaking News

ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक 200 रूपये दर देणार

सांगली, दि. 07, नोव्हेंबर - सांगली जिल्ह्यात यंदा गाळप होणा-या ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक 200 रूपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकारी साखर कारखानदार  व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात कोल्हापूर येथे ठरलेल्या कोल्हापूर पॅटर्ननुसारच हा निर्णय झाला. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हेही उपस्थित  होते. 
यावर्षीसाठी गळीत हंगामाची तयारी जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी केली होती. परंतु ऊसदराबाबत अंतिम तोडगा निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या क ार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात ऊसतोडी रोखून ठेवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांना गळीतासाठी ऊस उपलब्ध होत नव्हता. या पार्श्‍वभूमीवर क ोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी, साखर कारखानदार विनय कोरे यांच्यात सर्वसहमतीने तोडगा काढण्यात आला. याच पध्दतीने  सांगली जिल्ह्यातही दर देण्याचे मान्य करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतक-यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याने साखर कारखान्यांचे गळीत सुरळीत सुरू झाले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. हा निर्णय सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर क ारखान्यांनी मान्य केला असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.
गतवर्षी एफआरपी अधिक 175 रूपये असा ऊसदर तोडगा निघाला होता. अधिकची रक्कम दोन महिन्यांनी मिळाली. याशिवाय प्रतिटन 500 रूपये जादा ऊसदरासाठी उभारलेल्या  लढ्यात प्रतिटन 350 रूपये मिळाले. यंदा कृषीमूल्य आयोगाने एफआरपी 2300 रूपयावरून 2550 रूपये केली आहे. सरासरी 12.5 उतारा पाहता एक टक्के उता-याला 268 रू पयांप्रमाणे रक्कम वाढते. हे गणित लक्षात घेता यावर्षी एफआरपी अधिक 200 रूपयांचा तोडगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केला आहे. या निर्णयामुळे गतवर्षीपेक्षा प्रतिटन  353 रूपये शेतक-यांच्या हाती पडणार आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.