Breaking News

लालूंच्या केसालाही धक्का लागल्यास मोदींचे चामडे सोलण्याची भाषा .


बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर त्यांचे पुत्र तेजप्रताप यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी उघड धमकी दिली आहे. लालूंच्या केसालाही धक्का लागल्यास मोदींचे चामडे सोलण्याची प्रक्षोभक भाषा त्यांनी सुरू केली आहे. सुरक्षा कवच काढून लालूंच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी सुरक्षेची नुकतीच समीक्षा केली असून त्यानंतर लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी, माजी निवडणूक आयुक्त नसीम झैदी, सेवानिवृत्त सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, माजी नायब राज्यपाल नजीब जंग आणि केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी आदींची झेड प्लस सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. लालूंना आता केवळ झेड सुरक्षा मिळणार आहे. 

या आरोप-प्रत्यारोपांमुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे, झेड प्लस सुरक्षा काढल्याने आपण घाबरलो असल्याचे मोदींना वाटत आहे. पण बिहारची जनता तसेच राज्यातील प्रत्येक बालक माझे संरक्षण करण्यास सज्ज असल्याची प्रतिक्रिया लालूंनी ट्विटरवरून दिली आहे. .