Breaking News

नवदाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.


वर्धा : शहरालगतच्या म्हसाळा येथे नवदाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. आशीष सुरेश दुबे (३१) व सीमा आशीष दुबे (२८) अशी मृतकांची नावे आहेत. या नवदाम्पत्यामध्ये काहीतरी वाद झाला. त्या वादात सर्वप्रथम सीमाने घरामागील विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ आशीषनेही विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.