Breaking News

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळ - खा. अशोक चव्हाण

महाड, दि. 05, नोव्हेंबर - गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सत्तेत बसलेल्या लोकांना जनतेचे प्रश्‍नांची उत्तरे सोडा प्रश्‍नही माहित  नाहीत. या सरकारला चले जाव असे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केले. सरकारच्या चुकीच्या धोरणां विरोधात आयोजित जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील 12 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी सरकारला लाज कशी वाटत नाही. सरकारची कर्जमाफी फसवी असून कर्जमाफीतून मत्स्यव्यावसाय क रणा-या शेतक-यांना वगळून कोकणातल्या मत्स्यव्यावसायिकांवर अन्याय केला आहे. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्‍नांनी देणे घेणे नसून जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून का ँग्रेस पक्षाने सुरु केलेला संघर्ष या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला - पृथ्वीराज चव्हाण
भाजप सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असून निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन या सरकारने पाळले नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली  आहे. कुठलाही वर्ग सरकारच्या धोरणांवर समाधानी नाही. परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी केला.