गपु पपुच्या गुडगडीचा डाव
दि. 05, नोव्हेंबर - अहो! ऐकलत का.. कच्छच्या वाळूत म्हणे गुडगुडीचा खेळ हाय..खेळामंधी गपू पपू हारदिक असं कुणी कुणी खेळतया.आपल्याकड नव्हं का कार्ट्यांच चालत....भांडी भांडी तसच काही तरी हाय म्हणत्यात.
कुणी कायबी म्हणत्यात.
गपू म्हणे या खेळातून मायंदाळ कमावणार आपल्या भारताला महासत्ता बनविणार.पपूच्या घरच्यांनी म्हणं या देशाचा वाटोळं केल बाई.
ये भटक भवाने !गप पडती का ,का हाणू टाळक्यात खुरप्याचा दांडा.गुमान चल वावरात आपलं आपलं खुरपं घे अन् खुरपत बस.नको तो खेळ खुरपू.
आता गं बाई! तुमचं आपल असच ...शेजारची दगी सांगत होती आमचे हे ना जात्यात चावडीवर.काही काही ऐकतात अन् माला सांगत्यात.तुम्ही बसा इथचं अंडे घालत चुलीपाशी.
शेंबडे त्या दगीला काय पडली व्हयं एव्हढी.
अहो सांगा ना गडे काय हाय तो खेळ...
ऐकायच का? ऐक.पण आधी खुरपं घे अन ढळ माझ्यासोबत वावरात,,,वाटानं सांगतो समदं.
गपू य ना सध्या लई जोरात हाय...दिल्ली पासून गल्लीपर्यंत समदीकडं त्याचच नाव निघतयं.
तीन वरसापूर्वी नव्हं का तो आलता आपल्या गावात..पंधरा लाखाचं गठूड घेऊन तोच हा .
चंदूच्या बापू! मग काय झालं हो त्या पंधरा लाखाचं?
डोंबल तुझं.ऐकायच का ..गुमान बस.
आपल्यासारख्या गरीबास्नी पंधरा लाख देणार,घरात सस्तातला गस बी देणार हे तर काहीच नाय,घराघरात लाइट,शेतात पाट येळ पडली तर नदी बी.
आता गं बया..हरिश्चंद्र आला का काय?
टकूळे !ऐकून घेना पूरं..हे तीन वरसा आधीचं सांगीतलं...तसाच तिकडं हा खेळ सुरू हाय.
म यात पपू,तो हारदीक चा समंध?
आपल्याकड आट्यापाट्या,खो खो काय एखला गडी खेळतो व्हयं...पपू,हारदिक येगळ्य पारटीतलं.
गपू य ना पपूला लईच वंगाळ वंगाळ बोलूत व्हता.तीन वरीस गुमान ऐकल पठ्यानः अन् आता वार्यासारखा सुटलाय.मायंदाळ गंमत येती बघ.
गपू म्हणतो पपूच्या पणज्यानी,आजीनं बापानं आईनं काहीच गेल नाही.ढेरीला हात पुसलं फकस्त.
आरं देवा! असं हाय तरः थोडंथोडं येतंया टाळक्यात.मग काओ,आपल्या इहीरीवर मोटार कुणी आणली? घरात तो टीव्ही का फिव्ही तो कसा आला? पोरायकं तो काय म्हणत्यात ते बिगर वाईरचं मोबाईल, कांपूट्यर ही काय भानगड हाय...कुणी दीलं ओ..
समदं खरं हाय तुझं.पपूच्या वाडवडीलांची पुण्याई हाय ती.पण गपू जोरात हाय नवं? त्यास्नी कोण समजवणार?
बर जाऊ द्या..फसणवीस कोण हाय..त्याच्या वर म्हणं आपल्या गावाजवळ एका येड्यानं बूट फेकला?
लईच पोचली गं तू.लेकानं फसवलं म चिडला तो येडा आन् हाणला बूट फेकून .नोकरी देणार हूता तो.पण नाय दिली.
पण म्या असं ऐकलया की फसणवीस औरंगाबादीला जाणार हुतं मग आपल्या गावाकडं कसं आलं बूट खायला....
पाया पडतो तुझ्या ...लई इद्या दावू नको.
सांगा ना चंदूच्या बापू.आगं बाई खरया तुझं पण तीथं ते क्रांती मोरचावालं बसलीत ना.मग फिरवल इमानं आपल्या गावाकडं ....
का ओ..मगं काय झालं.?
आता नगं ...खुरपून झालं की मग......