गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू
बेगुसराय (बिहार), दि. 04, नोव्हेंबर - कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय इथल्या घाटावर गंगास्नान करताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे.
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बेगुसरायच्या सिमरिया घाटावर आज पुजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात तीन वृद्ध महिलांचा बळी गेला. तर जखमींची संख्याही मोठी आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर इतर भाविकांसह जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी बचावकार्य सुरु केलं. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसरीकडे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या दुर्घटनेसाठी जिल्हा प्रशासनाला दोषी ठरवत, नितीश सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी, असं म्हटलं आहे.