Breaking News

हरिगावच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर कंपनी हायस्कूल हरिगाव येथील मार्च १९६७ ला ११ वी परीक्षा देऊन शाळा सोडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पुण्यातील ऋतूगंध सभागृह, येथे मोठ्या उत्साहात पार पडला. 


विद्यार्थ्याना ज्यांनी शिकविले, ते माजी माजी मुख्याध्यापक वाय. एन. बाळ, श्रीकांत वांकर आदी उपस्थित होते. दि. २३ जानेवारी २०११ ला सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अविनाश आदिक, स्व. गोविंदराव आदिक, निशिकांत नाईक, यांच्या उपस्थितीत हरिगाव येथे शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव निमित्ताने साजरा करण्यात आला होता. त्याप्रमाणे स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत ५० वर्षांनी जुने वर्गमित्र एकत्र आले.