बाल कलाकारांनी चित्रांच्या माध्यमातून उलगडले आपले भावविश्व
पुणे, दि. 11, नोव्हेंबर - स्वच्छ भारत अभियान... पाणी वाचवा... झाडे लावा झाडे जगवा... पारंपारिक सण-उत्सव... अशा सामाजिक, पर्यावरण, सांस्कृतिक विषयांमधून आपल्या आजूबाजूला घडणा-या विविध गोष्टी चित्रांच्या माध्यमातून बालकलाकारांनी कॅनव्हासवर चितारल्या. बालदिनानिमित्त कन्व्हर्सेशन्स इन कलर्स या चित्रप्रदर्शनातून बालकलारांनी आपले भावविश्व 2 हजार चित्रांच्या माध्यमातून उलगडले.
कलास्वाद, कलाकृती आणि कलास्पर्श या संस्थांतर्फे बालदिनाचे औचित्य साधून 600 हून अधिक बालकलाकारांच्या 2 हजार चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बालकलाकारांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनामध्ये साडेतीन वर्ष ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची विविध चित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारी, क्रिकेट-कब्बडी अशा मैदानी खेळांची, बस स्थानकावरील गर्दी, मेट्रो अशी वाहतूकी विषयी संदेश देणारी, पालखी, शिवजयंती, गणेशोत्सव, ख्रिसमस, असे सण साजरे करून भारताची संस्कृती दर्शवणारी अशा प्रकारची विविध निसर्गचित्रे, स्मरणचित्रे, गोष्टीरुप चित्रे, संकल्प चित्रे, वस्तूचित्रे तसेच पोटेलट्स, कॅनव्हास पेंटींग्स, पेन आर्ट ड्रॉईंग्स, क्विलींग, डॉट पेंटिंग्स, वारली पेंटिंग्स अशी विविध चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र, तसेच नोटाबंदीविषयावरील थ्रीडी चित्र अशा विविध कलाकृतींचे प्रात्यक्षिक यावेळी बालकलाकारांनी दाखविले. हे प्रदर्शन रविवार, दि. 12 नोव्हेंबरपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.