..तर पंकजा मुंडेंची साथ देऊ - धनंजय मुंडे
पुणे, दि. 11, नोव्हेंबर - मराठवाड्यात पाणी प्रश्न, उसतोड कामगारांचा प्रश्न असे अनेक गंभीर आणि महत्वाचे प्रश्न आहेत. आयआयएमसारखी संस्था जी औरंगाबादला होणार होती ती या सरकारने नागपूरला हालवली, जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी यासारखी एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखावी यासाठी जर त्यांना कुणाशी भांडण्याची वेळ आली तर मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांची साथ देऊ, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मराठवाडा प्रोफेशनल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या थेट संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विशाल कदम, विठ्ठल कदम, बालाजी फड, कुलदीप आंबेकर, मारूती अवरगंड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर मुंडे यांनी उत्तरे दिली.
मुंडे म्हणाले, मराठवाड्यात पाण्याबरोबरच उसतोड मजुराचा प्रश्न आहे. उसतोड कामगारांना दिल्या जाणार्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी कृषीमंत्री शरद पवार घेत असत. परंतु ज्यांना उसतोड कामगारांचे प्रश्न माहीत नाहीत ते आता लवादाचे प्रमुख झाले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळेस पंकजा मुंडेचे नाव न घेता लगावला. मराठवाड्याच्या विकासाठी आपण पंकजांच्यासोबत कुठल्याही मंचावर एकत्र येण्यास तयार आहोत परंतु त्यांनी आयआयएमसारखी संस्था मराठवाड्यात आणुन दाखवावी. मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असुन सध्याच्या सरकारची मानसीकता ही केवळ विदर्भाच्या विकास करणारी आहे असेही ते म्हणाले. एका विद्यार्थ्यांने विचारलेल्या मराठवाड्याचा विकास कसा होवु शकतो यावर उत्तर देताना मुंडे म्हणाले, मराठवाड्याच्या प्रगतीसाठी औद्योगीक क्षेत्रातील विकास होणे गरजेचे आहे. मराठवाड्यात सध्या औरंगाबादजवळील वाळुंज व सेंद्रे याठिकाणीच एमआयडीसी आहे. ही दोन्ही गावे औरंगाबादला लागून आहेत त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प हे फक्त औरंगाबाद जिल्ह्यातच न होता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही झाले पाहिजेत. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारले गेले पाहिजे यासाठी आपण कायम पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगीतले. शेतकर्यांबाबतीत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मुंडे म्हणाले, गुजरातमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे याठिकाणी कापसाला क्विंटलमागे पाचशे रुपये बोनस दिला जातो त्याचप्रकारचा बोनस महाराष्ट्रातील शेतकर्यांना देखील दिला जावा यासाठी राज्यसरकारकडे वारंवार मागणी करुनदेखील निर्णय होत नाही. तसेच वर्षातील एक मंत्रीमंडळाची बैठक ही मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये व्हावी आणि या बैठकिमध्ये फक्त मराठवाड्याच्या विकासाची चर्चा व्हावी यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना वारंवार निवेदने दिली आहेत मात्र, मुख्यमंत्री यावर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय घेतला जात नाही. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याची व्यवस्था नाही अशा विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुंडे म्हणाले, फक्त मराठवाडाच नाही तर राज्यातील इतरही भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून सरकारी वसतीगृहाची सोय व्हावी यासाठी आपण येत्या नागपूर अधिवेशनात याची मागणी लावून धरणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भाजपाला खरा लाभार्थी सापडेना - मुंडे
राज्य सरकारतर्फे मी लाभार्थी या प्रकारच्या जाहीराती केल्या जात आहेत. परंतु राज्यभरात भारतीय जनता पक्षाने जाहीरात केलेले लाभार्थ्यांवर संशय व्यक्त होत आहे. पुरंदर याठिकाणी लाभार्थी म्हणुन निवडलेल्या शेतकर्याला आघाडी सरकारच्या काळात लाभ झाला असल्याचे बोलले जाते. तसेच पुण्यातील रईसा शेख यांनादेखील आघाडी सरकारच्या काळात फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपला खरा लाभार्थीच सापडत नसुन हे या सरकारचे दुर्देव आहे असा टोला मुंडे यांनी यावेळी लगावला.