नोटबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी : माजी आ.दिलीपकुमार सानंदा
बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - नोव्हेंबर 2016 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचा विश्वासघात केला. नोटबंदीच्या निर्णयामुळे छोटे उद्योजक आणि शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला. ऐन शेतमाल बाजारात येण्याच्या हंगामात जबरदस्तीने लादलेली नोटबंदी त्या क ारणातून चलन टंचाईचे कारण दाखवून बाजारात पाडलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी पुर्णत: उध्वस्त झाला. नोटबंदीमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. या दिवाळखोर निर्णयाने सगळे आर्थिक व्यवहार ठप्प केले. नोटबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास दर खालच्या स्तरावर पोहचला असुन हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी असल्याचे प्रतिपादन माजी आ. दिलीप सानंदा यांनी केले.
नोटबंदीच्या वर्षपुर्तीनिमित्त काँंग्रेसच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व भाजप कार्यालयासमोर काळा दिवस पाळुन नोटबंदीच्या निर्णयाविरुध्द जोरदार निदर्शने देऊन धरणे आंदोलन करण्यात आली. त्याप्रसंगी सानंदा बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शहर अध्यक्ष प्रविण कदम, महिला तालुकाध्यक्षा भारती पाटील, शहर अध्यक्षा सुरजितकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, कृ.उ.बा.स.सभापती संतोश टाले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मो.वसीमोदद्ीन, शहर अध्यक्ष बबलु पठान, तालुकाध्यक्ष शफाभाई, माजी जि. प. सदस्य सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण धोटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना दिलीप सानंदा म्हणाले की, नोटबंदीच्या निर्णयामुळे लोकांचा छळ झाला. बँँकेच्या रांगेत लागुन शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देश संक टात आहे. या निर्णयाने समाजातील विविध घटकांना जो फटका बसला त्यातुन अजुनही देश सावरलेला नाही. आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पंतप्रधान मोदीजींच्या म्हणण्यानुसार नोटबंदीमुळे आधी बनावट नोटांचा नायनाट होणार होता मग काळा पैसा दुर होणार होता, पुढे जम्मु काश्मीर सिमे पलीकडच्या पाकि स्तानातुन दहशतवाद्यांना होणारी आर्थिक रसद बंद होणार होती. परंतू या निर्णयानंतरही दशहतवादी कारवाया बंद झालेल्या नाही. अनेक अर्थशास्त्रज्ञ नोटबंदीचा निर्णय हा पुर्णपणे फसला असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. नोटबंदीनंतर रदद् झालेल्या 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत. हे आरबीआयने सांगितलेले आहे. फक्त जेमतेम 1 टक्केच नोटाच रदद् झाल्यामुळे प्रचंड काळा पैसा बाहेर येईल ही केवळ एक अफवा ठरली. रद्द झालेल्या नोटांइतक्या नोटा पुन्हा चलनात आणण्यासाठी नव्या नोटांच्या छपाईवर 8 हजार कोटींहुन अधिक रक्कम आरबीआयला खर्च करावी लागली. या दरम्यान जो काही काळा पैसा होता तो पांढरा करुन घेण्याची सोय सरकारनेच उपलब्ध करुन दिली. अडीच लाख रुपयापर्यंतच्या ठेवीवर काहीही प्रश्न विचारले जाणार नाही अशी सोय असल्याने अनेकांनी इतरांच्या नावावर रक्कम भरुन आपला पैसा पांढरा करुन घेतला. नोटबंदी सारखा टोकाचा निर्णय न घेता सुध्दा कायद्याने काळा पैसा बाहेर काढता आला असता. सध्याची अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती पाहता देश अजुनही नोटबंदीच्या धक्क्यातून सावरलेला नाही हे दिसुन येईल. जर नोटबंदी यशस्वी झाली असेल तर पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येकाच्या जन-धन खात्यात 15-15 लाख रुपये जमा क रावे, असा प्रतिटोलाही दिलीपकुमार सानंदा यांनी लगावला आहे.