पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्यापासुन रोखण्यात यावा
बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - संजय लीला भंसाली यांनी राजपुत समाजाच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केल्याने पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होवु देऊ नये याबाबतचे निवेदन दि. 9 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने खामगांव उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अमरावती विभागाच्या महिला अध्यक्षा भारतीताई सिसोदिया, बुलडाणा जिल्हा संगठन मंत्री अभयसिंह राजपुत, वरिष्ठ महामंत्री राजेंद्रसिंह राजपुत, जितेंद्र राजपुत, अजयसिंह राजपुत, सुनिलससिंह रघुवंषी, डॉ.आर.के.राजपुत, देवसिंह ठाकुर आदी समाज बांधव उपस्थित होते.
निवदेनात म्हटले आहे की, हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी राजपुत समाजाचे फार मोठे योगदान आहे. राजपुत समाजाने केलेल्या प्राण, त्याग आणि बलिदानाने हे राश्ट्र उभारले आहे. महाराणी पद्मावती यांनी सोळा हजार क्षत्रीयांनी स्त्रियांसोबत आत्मबलिदान करून हिंदु संस्कृतीच्या इतिहासाची इज्जत राखली याची भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद केलेली आहे. संजय लीला भंसाली यांनी राणी पद्मावती यांच्या जीवनावर पद्मावती चित्रपट काढला आहे. ज्यामध्ये राणी पद्मावती यांच्या चारित्राचे विद्रुपीकरण करून सार्वजनिक रित्या प्रद र्शित करीत आहेत. राजपुत समाज बांधवांच्या भावना लक्षात घेवुन पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासुन रोखण्यात यावा व पद्मावती हा सिनेमा बुलडाणा जिल्हयातील कोणत्याही चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात येवु नये. प्रदर्शित झाल्यास होणार्या परिणामास चित्रपट निर्मातेे संजय लीला भंसाली व सिनेमा प्रदर्शित करणारे चित्रपट गृह व सिनेमा वितरक हेच जबाबदार राहतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर रेखा अमरसिंह ठाकुर, अमरसिंह ठाकुर, चरणसिंह पवार, पवन राजपुत, सुरज राजपुत, शुभम राजपुत, उमेशसिंह राजपुत, शिवाजी इंगळे, विरेंद्र राजपुत, आदींच्या सह्या आहेत.