Breaking News

जळकोट नगर पंचायतीच्या अध्यक्षांविरूद्ध अविश्‍वास ठराव दाखल

लातूर, दि. 04, नोव्हेंबर - जळकोट नगर पंचायतीत नगर पंचायतीच्या 17 पैकी 15 सदस्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन नगर पंचायतीचे अध्यक्ष व्यंकटराव तेलंग यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. दोन वर्षांपुर्वी निवडणूक झालेल्या नगर पंचायतीपेकी अध्यक्षांवर अविश्‍वास आणणारी पहिली नगर पंचायत आहे. 17 सदस्यीय जळकोट नगर पंचायतीत भाजपा 10, काँग्रेस व राष्ट्र्वादी प्रत्येकी 02, एमआयएम शिवसेना व अपक्ष प्रत्येकी 01 असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी भाजपाचे नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग व सदस्या रोहिणी केंद्रे वगळता 08, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी 02, एमआयएम, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी 01 अशा एकूण 15 सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला.