Breaking News

वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी फिरवली पाठ २८ नोव्हेंबरला पुन्हा होणार लिलाव

राहुरी, जामखेड, श्रीगोंदा या तीन तालुक्यांमधील नदीपात्रात असलेल्या २० वाळू साठ्यांचा १४ नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात आला होता. परंतु वाळूठेकेदारांनी या लिलावास प्रतिसाद न दिल्याने फक्त दोनच वाळू साठ्यांचा लिलाव करण्यात आला. आता उर्वरित १८ वाळू साठ्यांसाठी २८ नोव्हेंबरलापुन्हा लिलाव होणार असून हे लिलाव ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.


२८ नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावामध्ये राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील कोल्हार खुर्द, तसेच मुळा नदीवरील दरडगाव थडी , चिखलठाण,आरडगाव, तांदूळवाडी पिंप्रीवळण , चंडकापुर, चिंचोली, बारागाव नांदुर येथील वाळू साठ्यांचा लिलाव होणार आहे.

तसेच जामखेड तालुक्यामधील सिनानदीवरील जवळा, चोंडी १, चोंडी २, मांजरा नदीवरील जातेगाव या ठिकाणच्या वाळू साठ्यांचे लिलाव होणार आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील भिमानदीवरील अनगरे, घोड नदीवरी डोमाळवाडी व वांगदरी येथील वाळू साठ्यांचे लिलाव होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यावरीललिलावात किती साठ्यांचा लिलाव होईल या कडे प्रशासनाचे लक्ष आहे.