Breaking News

हमाल पंचायत येथे कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न


खर्च व वेळेची बचत करुन तसेच तांत्रिक बाबींचा अडसर टाळून जलदगतीने न्याय मिळवून देण्याच्या हमी करता, प्रलंबित प्रकरणांमध्येतसेच असे वाद जे न्यायालयासमक्ष आणले गेले नाहीत अशा वादांमध्ये समझोता करीता, लोक न्यायालय आयोजित करुन वैवाहिक वाद मध्यस्थ आणिसमेट पद्धतीने मिटविणे, पक्षकार आणि सर्व सामान्य जनतेत, सामाजिक व विधी दृष्ट्या महत्वाच्या मुद्दयांवर कायदेशीर बाबी संबंधी जागरुकतानिर्माण करणे, गरजू व्यक्तींना मोफत सहाय्य करणे आदी कार्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे चालत असते. त्याचा लाभ गरजूंनी घेऊन आपल्याकायदेशीर बाबींची सोडवणूक करुन घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पद्माकर केस्तीकर यांनी केले.

जिल्हा हमाल पंचायत येथे कायदे विषयक जनजागृती शिबीराचे शिबीराचे उद्घाटन केस्तीकर यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळीजिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हा सरकारी वकिल एस.के.पाटील, अॅहड.लक्ष्मण वाडेकर, अॅहड.शिवाजी कराळे, कॉ.बाबा आरगडे, अॅ्ड.विक्रम वाडेकर, अॅड. सुरेश ठोकळ, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, विष्णूपंत म्हस्के, लक्ष्मीबाई कानडे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अध्यक्ष घुले म्हणाले, हमाल-माथाडी कामगारांना कायद्याची माहिती व्हावी, त्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य कळावित.त्यांच्या कायदेविषयीक अडचणी सोडविण्याचा या शिबीराच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आहे. आज अनेक कामगार हे अल्पशिक्षित असल्यानेअनेकवेळी सरकारी व कायदेशीर कामे करताना अडचणी येत असतात. त्यातुन त्यांना लुबडलेही जाते. यासाठी अशा कायदेविषयी शिबीराच्यामाध्यमातून त्यांना किमान प्राथमिक ज्ञान प्राप्त होऊन कोणत्या परिस्थितीत कोणाकडे जावे हे समजेल. स्व.शंकरराव घुले हमाल-मापाडी कामगारांच्याहक्कासाठी नेहमीच लढले. कायदेशिररित्या त्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघटना त्यांच्या नेहमीच पाठिशी राहील,असे ते म्हणाले.

याप्रसंगी अॅ ड.लक्ष्मण वाडेकर यांनी माथाडी कामगार कायदा व हमालांविषयीचे प्रश्नांंविषयी चर्चा केली. अॅमड.शिवाजी कराळे यांनी कामगारांनाहक्क व अधिकार या विषयी मार्गदर्शन केले तर कॉ.बाबा आरगडे यांनी हमाल-माथाडी व असंघटीत कामगारांना कायद्याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.व्ही. देशमुख व संजय महापुरे यांनी केले तर आभार अॅरड.विक्रम वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमास अशोक बाबर,बापूसाहेब बडे, बाळासाहेब वडागळे, भैरु कोतकर, आर.ए.नगरकर, योगेश हळगांवकर, रतन येणारे, मुकुंद कांबळे आदिं हमाल-माथाडी व असंघटीतक्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.