Breaking News

अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा.बार्नबस यांना आशिया इंटरनॅशनल फॉर एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार

 अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांना नुकत्याच दुबईत झालेल्या इंडो युएई मैत्र संमेलनात आशिया इंटरनॅशनल फॉर एज्युकेशन एक्सलन्स हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 


डॉ.आर.जे. बार्नबस यांनी आपल्या मातोश्री सरला बार्नबस यांच्या हस्ते सत्कार स्विकारला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे, सारंग पंधाडे, मयुर विधाते, स्नेहल यादव, शहेजाद खान, प्रतिक शिंगवी, शरद चव्हाण, अन्सार सय्यद, वैभव पांडे, मयुर कदम, अक्षय घोरपडे, आदिंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विधाते म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य बार्नबस यांना मिळालेला आंतराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. अनेक दिग्गज व्यक्तीमत्व या महाविद्यालयातून घडले असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत या महाविद्यालयाचे भरीव योगदान राहिले आहे. प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांची शैक्षणिक क्षेत्रात अविरत वीस वर्षापेक्षा जास्त सेवा अद्याप पर्यंन्त चालू असून, या पुरस्काराने नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.