ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल अशी ही घटना आहे. उत्तर प्रदेशात उरई जिल्ह्यात जलाऊ इथे जिल्हा तुरूंग आहे. या जेलच्या परिसरात येथील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काही रोपटी लावली होती. या रोपट्यांची आणि इतर झाडाझुडपांची या गाढवांनी नासधूस केली. म्हणून चिडून इथल्या जेलरने या गाढवांना अटक केली कैदेत डांबून ठेवलं. या गाढवांना एक दिवस दोन दिवस नाही तर तब्बल चार दिवस डांबून ठेवलं. या गाढवांचा मालक कमलेश गाढवांना शोधत जेलपर्यंत आला. त्याने गाढवांना सोडा अशी मागणी केली.पण जेलरने काही सोडलं नाही. अखेर एका स्थानिक नेत्याच्या मदतीने त्याने अखेर आपल्या 10 गाढवांची सुटका करून घेतली. त्यामुळे या देशात गाढवांनाही आता अटक होऊ शकते हे स्पष्ट झालं आहे.
झाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेल.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:38
Rating: 5