Breaking News

रेल्वे परिसरात अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या पाच हजार लोकांवर कारवाई

पुणे, दि. 10, नोव्हेबर - पुणे रेल्वे मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकक्षेतील रेल्वे स्थानकांवर अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या तसेच रेल्वे लाईन ओलांडणा-या 5849 नागरिक ांवर पुणे रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे.जानेवारी ते ऑक्टोबर, 2017 मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या नागरिकांवर केलेल्या क ारवाईत सहा लाख 52 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलकडून करण्यात आली आहे.रेल्वे परिसरात प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच प्रवेश क रावा. तसेच अनधिकृतपणे रेल्वे लाईन ओलांडणे जोखमीचे असल्याने असा प्रकार नागरिकांनी करू नये. असे करताना आढळल्यास संबधित नागरिकांवर आर्थिक दंड व कैद अशी  शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे, आवाहन मंडळ सुरक्षा आयुक्त डी. विकास यांनी केले.