आसोदा येथील रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी एक कोटीचा निधी देणार - गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 10, नोव्हेबर - जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी रस्त्यांची कामे करणे ही काळाजी गरज आहे. यामुळे येत्या दोन वर्षात गावातील सर्व रस्ते माती-मुक्त करण्यासह शुद्ध पाणी योजना कब्रस्तानातील सुविधा आदी कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे आश्वासन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आसोदा येथील ग्रामस्थांना दिले.
आसोदा गावातील पुलाच्या भुमीपुजन तसेच काँक्रिट रस्त्यांच्या लोकार्पणावेळी मंत्री पाटील बोलत होते. या वेळी इंदिरा नगरातील 30 लाखाच्या पुल तसेच डॉ. आंबेडकर नगरातील पेव्हर ब्लॉकसह महादेव मंदिर ते वाणी गल्लीपर्यंत काँक्रीटीकरणाच्या 43 लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण ही या वेळी करण्यात आले. तालुक्यात रस्ते काँक्रीटीकरणासह अनेक क ामे अल्पकाळात पुर्ण झाली आहेत. त्यामुळे जनमत बदलले आहे. जनतेला कामे करणाराच नेता हवा असून ती गरज आपण पुर्ण करणार असल्याचेही राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी सांगितले.