रमेश कदम यांचा मंगळवारी काँग्रेस प्रवेश
रत्नागिरी, दि. 19, नोव्हेंबर - चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम येत्या मंगळवारी (दि. 21 नोव्हेंबर) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नऊ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांना कोणतेही पद किंवा जबाबदारी मिळाली नाही. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे कदम समर्थक नाराज होते. त्यामुळेच समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कदम यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्यानुसार ते येत्या मंगळवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतल मंत्रालयासमोरील निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, कोकण विभाग प्रमुख माजी आमदार माणिक जगताप, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कदम समर्थक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रमेशभाई प्रतिष्ठानतर्फे श्रीकृष्ण खेडेकर यांनी केले आहे.