15 दिवसानंतर कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होणार - सदाभाऊ खोत
औरंगाबाद, दि. 19, नोव्हेंबर - शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली असून सध्या शेतक-यांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्याचे काम असून पंधरा दिवसानंतर कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते विविध कार्यक्रमासाठी औरंगाबाद शहरात आले होते.
सध्या फार्मा कंपन्या स्थापन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. आपण आज पेरणी करायला शिकलो, निंदणी करायला शिकलो, परंतु धान्य विकायला शिकलो नाही. बोलताना आपण मोठ्या उद्योजकांची नावे घेतो, परंतु त्यांच्यासारखे मोठे व्हायला शिकलो नाही. तरुणांनी व्यवसाय करावा. स्वत: विकास क रून घ्यावा, इतरांनाही रोजगार दयावा असे आवाहन त्यांनी केले. हे सरकार शेतक-यांच्या दीर्घकाळ हितासाठी अनेक उपाययोजना करत असून कर्जमाफीची रक्कम पंधरा दिवसांच्या आत शेतक-यांच्या नावे जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
