Breaking News

फटाका कारखान्यात स्फोट होवून कामगाराचा मृत्यू

उस्मानाबाद, दि. 19, नोव्हेंबर - आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील इंदापूर येथील फटाका कारखान्यात स्फोट होवून एक जण ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वाशी तालुक्यातील इंदापूर-तेरखेड्याच्या परिसरात रॉयल फायर वर्क्स या फटाका कारखान्यात हा अपघात झाला. 


कारखान्याच्या मुख्य गोडाऊनमध्ये हा स्फोट झाला तेेव्हा तेथे असलेले कामगार रवींद्र दत्तू लगाडे (वय 50, रा. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारखाना मालक समीर मुलानी यांचा नातलग सोहेल शेख (वय 19, रा. तेरखेडा) हा गंभीर जखमी झाला. कच्चा माल काढताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे छत फुटुन त्यांच्या अंगावर पडले होते. पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाई केली. या कारखान्यात या पुर्वीही असे अपघाती मृत्यु झाले असून एकून वापरण्यात येणारा कच्चा माल, कामगारांच्या जीविताची सुरक्षा या बाबींकडे महसूल विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.