Breaking News

तर शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम

अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - जिल्हा परिषद परिचर कर्मचार्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही यश आले नाही. दरम्यान, यासंदर्भात जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना निवेदन देण्यात येणार आहे. मात्र या निवेदनाचा विचार न झाल्यास शासनाच्या विरोधात काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार जिल्हा परिषद परिचर संघटनेच्यावतीने करण्यात आला. यासंदर्भात संघटनेच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी सर्व कर्मचार्यांची जिल्हा परिषेद मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच बैठक पार पडली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. परिचरमधून पशुधन पर्यवेक्षक पदावर पदोन्नत्ती, अशंदायी पेन्शन योजना, परिचर कर्मचार्यांचा गणवेश, प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणार्या कर्मचार्यांच्या अडचणी, शिक्षण विभाग / पशु संवर्धन विभागात काम करणार्या कर्मचार्यांचे प्रवास भत्ता बिले मिळणेबाबत, वनोपचारकपदांना तात्काळ पदोन्नत्ती देणे, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदोन्नत्ती रोस्टरची चौकशी होणे याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. 
अर्धवेळ स्त्री परिचरांना गणवेश मिळावा, शासकीय सुट्टी मिळावी, आकस्मित रजा मिळावी, प्रवास भत्ता मिळावा, शिबीर असेल तर मानधन मिळावे, यावरदेखील या बैठकीत चर्चा झाली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रक़ांत पाचारणे, सागर आगरकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान हरदास यांनी केले. 
या बैठकीस श्रीमती पुनम उदावंत, सागर आगरकर, मिराताई वाळूंजकर, अलका बनसोडे, मेजर लहानू उमाप, लक्ष्मण नारद, सुरेश भोजणे, बाळकृष्ण राऊत, श्रीमती गायकवाड, महेश आगलावे, बबन उमाप, दत्तात्रय राऊत, जयसिंग कडूस, श्रीमती भाग्यश्री, श्रीमत भांड, श्रीमती पवार, नितीन धुमाळ, विलास वाघ, कल्पना महाडिक, मंगल उगले, शालय जाधव, मोहन गोडगे, संजय कदम, मंगल वारे, सुरेखा जाधव, अशोक नागरगोजे ,भाऊसाहेब पडोळे  मच्छिंद्र चिलवर, सोन्याबापू जाधव, बी.के.देवगुणे, डि. आर. माळी, अमोल खोसे, प्रल्हाद डोंगरे, जालिंदर जंबे, किशोर फुलारी, व्ही. एस. भंवर, अशोक नागरगोजे आदींसह जिल्हा परिषद परिचर संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने  उपस्थित होते.