दशक्रिया प्रदर्शनावेळी पुरोहित संघटना, संभाजी ब्रिगेड आमने सामने
औरंगाबाद, दि. 18, नोव्हेंबर - आज औरंगाबाद येथील प्रोझोन माँलमध्ये प्रदर्शित होणारा दशक्रिया चित्रपट ब्राम्हण संघटनेने चित्रपटगृहात जावुन बंद पाडला. या वेळी संभाजी ब्रिगेड संघटनेने तिथे येवून दशक्रियाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या त्यामुळे बराच काळ तणाव निर्माण झाला होता.
शेवटी या गोंधळात चित्रपटगृहाची प्रदर्शित होण्याची वेळ संपून गेली त्यामुळे थोडा वेळच चित्रपट दाखवून बंद केला गेला. आज न्यायालयाने दशक्रिया चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी फेटाळल्यांनर पुरोहित संघटनेने दुपारी प्रोझोन मॉलमधे मोठया प्रमाणात जमा होऊन तेथील चित्रपटगृहासमोर घोषणाबाजी केली.
त्यामुळे कोणी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फिरकले नाहीत.मात्र ब्राम्हण संघाने बराच वेळ या चित्रपटाविरोधात घोषणाबाजी केली. नंतर तेथे संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी दशक्रिया दाखवलाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. दोनही संघटना आमने सामने आल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र हे सारे होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ निघुन गेली होती ब-याच घोषणाबाजीनंतर दोनही संघटना तेथून परत गेल्या.
