Breaking News

घणसोली पथदिवे बंद; स्थायी समितीने प्रशासनाला धरले धारेवर

नवी मुंबई, दि. 18, नोव्हेंबर - घणसोली गावातील पथदिवे बंद असल्याने अशा ठेकेदारावर पालिकेकडून का कारवाई होत नाही. असा सवाल नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करत संताप व्यक्त केला. ठेकेदार एवढे मुजोर झाले आहे. 

त्यामुळे या परिसरामध्ये अंधाराचे सांम्राज्य पसरले आहे, ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे पथदिवे जर बंद पडत असेल तर यांसदर्भात अंभियता विभाग का कारवाई करत नाही. अशा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी केली. त्यानंतर नगरसेवक अशोक गुरखे यांनी सीबीडी येथील मॅगो गार्डनमधील कामाचा प्रस्ताव आल्यांनतर दोन वर्षानंतर देखील कामांची निविदा काढली आहे. 

पण कामे सुरु झाले नाही कनिष्ठ अंभियता चा जागेवर पत्ता नसतो. त्यांना विचारले असता बघायला केबीन नाही, फिरायला गाडी नाही अशी कारणे सांगण्यात येतात. शहारात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. पामबीच मार्गावर देखील रात्रीच्या वेळी पथदिवे बंद अवस्थेत असतात. असा आरोप सभापती शुभांगी पाटील यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात हीच परिस्थिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्याावे अशी सुचना केली. या प्रकरणी अंभियता व ठेकेदाराची चौकशी करण्यात येईल. असे शहर अंभियता मोहन डंगावकर यांनी स्पष्ट केले.