शेवगाव नगरपरिषदेचे दफ्तर ताब्यात!
अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - नगरपरिषदेमध्ये निरनिराळ्या कामात झालेल्या गैरव्यवहार बाबत अर्ज देऊनही दप्तर चौकशीकामी होणार्या दिरंगाई बाबत भाजपचे नगर सेवक अरुण मुंढे, शारदा काथवटे यांनी शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात मंगळवारी दि.7 नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांनी दप्तर तपासणीच्या अनुषंगाने नगर परिषदेचे वाणिज्य रजिस्टर व पाणी पुरवठा कामाच्या देयकाची संचिका ताब्यात घेण्यात आली. आपल्या अर्जाच्या अनुषंगाने दि.10 नोव्हेंबर रोजी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे लेखी दिल्या नंतर मागे घेण्यात आले.
शेवगाव नगरपरिषदे मधील वाणिज्य विभागाच्या नोंदी व दप्तराची चौकशी वसुली विभागातील घरपट्टी व पाणीपट्टी या मधील तफावत तसेच 7/12 व 8अ या दप्तरा मध्ये झालेल्या नोंदी, टंकर द्वारे पाणी पुरवठा, पाईप लाईन व वाल लिकेज , त्याच बरोबर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मागील ग्रामीण पंचायतीच्या काळातील अंतिम देयक आदी विविध क ामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. या बाबत नगर सेवक मुंढे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार अर्ज सादर करून या बाबत दि.7 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन पुकारण्याचा निर्धार जाहीर केला होता. त्यानुसार नगरसेवक मुंढे व.काथवटे यांनी आज मंगळवार पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले. यावेळी नगरसेवक कमलेश गांधी, विनोद मोहिते, महेश फलके,यांच्या सह नितीन दहीवाळकर तुषार वैद्य, कचरू चोथे, गणेश कराड, कॉ.संजय नांगरे, अविनाश देशमुख, दिगंबर काथवटे, अशोक ससाणे आदी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलनास पाठींबा जाहीर केला.
दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून नगर परिषदेच्या आपण दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने नगरपरिषदेचे वाणिज्य रजिस्टर व पाणी पुरवठा योजनेच्या देयकाची संचिका ताब्यात घेण्यात आली आहे. 10.11.2017 रोजी आपल्या अर्जाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे मुंढे यांनी जाहीर केले.