‘सांगा ना साहेब..’ शासनाचे घरकुल कधी मिळेल?
अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशात कोणीही बेघर राहू नये यासाठी घरकुल योजना आणली मात्र या योजनेला देखील राजकारण्याची नजर लागली आणि आमच्या सारखे उघडे असलेले कुटूब वंचीत राहिले? सागा ना साहेब शासनाचे घरकुल कधी मिळेल ? असा संतप्त सवाल तेलकुडगाव येथील अरुण गंगाधर पातळे यांनी उपस्थित केला.
अरुण गंगाधर पातळे आपली कैफीयत मांडत असताना त्यांचे डोळे अक्षरश पाणवले होते. वर्षात अनेक सण-उत्सव येतात मात्र आम्ही कधीच कोणतेही सण -उत्सव साजरे करू च शकत नाही. आम्ही दररोज मोलमजुरी करतो आम्हाला कुठून सरकारची आर्थिक मदत मिळणार. आमच्यासाठी कोण सरकार पुढे हात पसरवणार. वडिलोपार्जित कोरडवाहू एक-सव्वा एकर शेती त्यात काय दोन लेकर बायको सह भागणार साहेब मोलमजुरी करूनच कुटूबाचा गाडा चालवत आहे गाव सधन आहे. तेलकुडगाव योजनेचा बोजवारा उडाल्याचे वृत्त देनिकात प्रसिद्ध होताच गावातील वंचितानी भेटून आमच्यापुढे हि व्यथा मांडली.
मात्र एक-सव्वा एकर शेतीत काय पिकणार दोन मुले आहेत ते उस तोड करतात आम्हाला राहायला नीट छप्पर नाही. पावसळ्यात तर झोपायला देखील जागा नसते घराच्या सर्व बाजूनी भिंती पडायला आल्या आहेत . दिवसातर घराच्या आतमध्ये सूर्य किरणे प्रखर येतात आम्ही घराचे बांधकाम करूच शकत नाही. आमची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे. आम्ही शासनाकडे व ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वेळोवेळी घरकुलची मागणी केली . मात्र आम्हाला घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. आम्ही आता लेकरबाळ घेऊन नेवासा पंचायत समिती च्या प्रांगणात आंदोलन करणार असल्याचे यावेळी अरुण पातळे यांनी सांगितले तसेच 2011 च्या सर्वेवेळी आमची परिस्थिती आणखी नाजूक होती गावात सर्वात अगोदर घरकुल योजनेत आम्हीच पाहिजे होतो. मात्र सर्वे करणार्या शासकीय कर्मचार्यांनी व ग्रामपंचायतने आम्हाला का टाळले ? हाच प्रश्न आम्हाला सतावात आहे हाच प्रश्न आम्ही शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून विचार असल्याचे त्यांनी सांगितले.